फत्तेपूर येथे ७० भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गृप ग्रामपंचायत कार्यालय,फत्तेपूर येथे मा. सरपंच सौ. रत्नाताई शंकर पाटील ,फत्तेपूर ग्रामपंचायत यांचे शुभहस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व उर्दू शाळा येथे उपसरपंच सौ. अन्नपूर्णा सोपान भोळे यांचे शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील,मंडळ अधिकारी महसूल,ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच फत्तेपूर येथील मान्यवर मंडळी उपस्थित होती. यानंतर सर्वांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
