नवीनतम सूचना

सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की,माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत प्राप्त झाली आहे. तरी सर्वांनी आपल्या बचत खात्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत त्वरित आपले गावाचे तलाठी अप्पा यांचेकडे जमा करावी !!!

Sunday, 27 January 2019

फत्तेपूर मंडळामध्ये व्हीव्हीपॅट मशीन(VVPAT) मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक संपन्न







मा. निवडणूक आयोग तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेकडील आदेशानुसार जामनेर तालुक्यातील  प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन व्हीव्हीपॅट मशीन (VVPAT) मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. फत्तेपूर मंडळातील विविध गावांमध्येही या नवीन मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक पार पडले. जामनेर तहसील कार्यालयाकडून नेमणूक झालेले पथक हे काम करीत आहे. सदर प्रात्यक्षिक करतांना मतदारांमध्ये या VVPAT यंत्राविषयी उत्सुकता दाखविण्यात आली. तसेच निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाचे कौतुकही नागरिकांकडून होत आहे. या मतदान यंत्राच्या वापरामुळे आमच्या मनात मतदान प्रक्रियेविषयी  कोणतीही शंका आता उरली नाही असे मतदारांनी सांगितले. 
फत्तेपूर मंडळातील प्रात्यक्षिकांमधील काही क्षणचित्रे VVPAT