आज दिनांक २१ /११/२०१८ रोजी ग्रामपंचायत कसबा पिंप्री ता.जामनेर येथील सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. मावळते सरपंच श्री राजेंद्र विठ्ठल पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली.
- ग्रामपंचायत कसबा पिंप्री चे सरपंच पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. सकाळी १०.०० ते दु. १२.०० या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आली. दुपारी ठीक २.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय,कसबा पिंप्री येथे सभा घेण्यात आली. सभेसाठी ९ विद्यमान सदस्यांपैकी ८ विद्यमान सदस्य हजर होते. सभेसाठी आवश्यक गणपूर्ती झाल्याने सभेस सुरुवात करण्यात आली.
- सदर सरपंच निवडणूकीसाठी सदस्य सौ. सुनिता दिगंबर माळी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने व ते छाननीत वैध ठरल्याने अध्यासी अधिकारी यांनी सौ. सुनिता दिगंबर माळी या ग्रा.पं.कसबा पिंप्रीच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.नवानिर्वाचित सरपंच यांचा यावेळी विद्यमान महिला सदस्य यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
- सदर सभेसाठी श्री. व्ही.एस.पाटील,मंडळ अधिकारी,फत्तेपूर भाग यांनी अध्यासी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. यावेळी सदस्य- श्री. राजेंद्र विठ्ठल पाटील,अफसरखान जफरखान पटेल,कमल सुरेश कुंभार ,राजधर प्रल्हाद चौधरी शरीफ तुराब तडवी,रजनीबाई सिद्धार्थ सुरवाडे,नसीमाबी बुढन तडवी हे उपस्थित होते. तसेच ग्रामसेविका श्रीमती रूपाली पाटील , तलाठी श्री. गणेश खोडवे आणि कोतवाल श्री पंढरी कांबळे यांनी अध्यासी अधिकारी यांना सहाय्य केले.
