मित्रहो,आपल्याला माहितच आहे की,शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणेकामी,विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामी,तसेच सरकारी नोकरीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना उत्पन्नाचा दाखला आपल्या गावाचे तलाठी यांचेकडून प्राप्त करून घेणे आवश्यक असते. सदर उत्पन्नाचा दाखला हा आता उत्पन्न अहवाल या नावाने ओळखला जातो.
सदरचा उत्पन्न अहवाल तलाठी यांचेकडून प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला तलाठी यांचेकडे विशिष्ट नमुन्यात अर्ज करावा लागेल. त्यासोबत आपले आधारकार्ड/किंवा कोणतेही एक ओळखपत्राची नक्कल जोडून अर्जावर अर्जदाराचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा लागेल. अर्ज संपूर्ण सुवाच्य अक्षरात भरून तलाठी यांचेकडे जमा केल्यानंतर तलाठी आपण अर्जात दिलेल्या माहितीची पडताळणी करून त्यांचेकडील अहवाल तयार करतील. सदर अहवाल मिळाल्यानंतर अर्जदार यांना आपल्या तालुक्याचे तहसील कार्यालय येथे किंवा नजीकच्या महा ई-सेवा केंद्रावर जाऊन तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला प्राप्त करता येऊ शकेल.
आपले सुविधेसाठी उत्पन्न अहवाल मिळविणेसाठीचा अर्ज खाली दिला असून तो डाउनलोड करून प्रिंट काढून वापरता येईल.
टीप- १) पगारदार नोकरांनी त्यांचे कार्यालयाकडून प्राप्त फॉर्म नं. १६ किंवा आयकर भरणा दाखल प्रत (IT Return) ची प्रत हजर करावी.
२) आपली शेतजमीन जर आपले तलाठी यांचे कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या गावी स्थित असेल तर तेथील तलाठी यांचेकडून गाव नमुना ७/१२ व ८ - अ (खाते उतारा) अर्जासोबत सादर करावा.
उत्पन्न अहवालाची प्रत उजव्या बाजूस असलेल्या महत्वाचे सदराखाली उपलब्ध आहे.
अथवा पुढील लिंक वर क्लिक करा.
>> उत्पन्न अहवाल नमुना अर्ज <<
उत्पन्न हे मागील आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाते. उदा. १ एप्रिल ,२०१८ रोजी दिला जाणार्या उत्पन्नाच्या अहवालात आर्थिक वर्ष १ एप्रिल ,२०१७ ते ३१ मार्च,२०१८ या कालावधीत अर्जित उत्पन्नाची आकडेवारी विचारात घेतली जाईल.