नवीनतम सूचना

सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की,माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत प्राप्त झाली आहे. तरी सर्वांनी आपल्या बचत खात्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत त्वरित आपले गावाचे तलाठी अप्पा यांचेकडे जमा करावी !!!

Sunday, 10 February 2019

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM KISAN) योजना

शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM KISAN) योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प शेतकर्‍यांना या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष रु. ६,०००/- इतके आर्थिक सहाय्य ३ टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदर योजेनेची प्रमुख वैशिष्टे 
  • रहिवास असलेल्या गावातील तसेच इतर गावातील  मिळून एकूण धारण क्षेत्र २.०० हेक्टर पेक्षा कमी असलेल्या शेतकरी कुटुंबास लाभ देय. 
  • कुटुंब म्हणजे पती-पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील मुले. 
  • केंद्र/राज्य/शासन अंगीकृत निमशासकीय संस्था/स्थानिक स्वराज्य संस्था/स्वायत्त संस्था यातील अधिकारी कर्मचारी (ड- वर्ग/चतुर्थ श्रेणी वगळून)- अपात्र
  • संवैधानिक पद धारण केलेले आजी-माजी व्यक्ती -अपात्र
  • आजी/माजी- राज्यसभा सदस्य/खासदार/आमदार/राज्यमंत्री/माजी मंत्री-अपात्र
  • विधानसभा/परिषद/महापालिका महापौर/जिल्हा परिषद अध्यक्ष-अपात्र 
  • १०,०००/- रु.चे वर निवृत्तीवेतन घेणारे - अपात्र
  • मागील वर्षात आयकर विवरण भरणारे-अपात्र
  • नोंदणीकृत डॉक्टर/वकील/अभियंता/चार्टर्ड अकाऊंटंट/आर्किटेक्ट इत्यादि क्षेत्रातील व्यक्ती
योजनेच्या अधिक माहितीसाठी पुढील लिंक्स वर क्लिक करा.