नवीनतम सूचना

सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की,माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत प्राप्त झाली आहे. तरी सर्वांनी आपल्या बचत खात्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत त्वरित आपले गावाचे तलाठी अप्पा यांचेकडे जमा करावी !!!

Sunday, 4 August 2019












नुकतेच दि. 1 ऑगस्ट ,2019 रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी कर्मचारी यांना जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय,श्री.अविनाश ढाकणे यांचे हस्ते गौरविण्यात आले . 
त्यात जामनेर तालुक्याचे तहसिलदार श्री. नामदेव टिळेकर यांना उत्कृष्ट तहसिलदार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. तसेच कसबा पिंप्री ता.जामनेर येथील रहिवासी व फत्तेपूर सजेचे कोतवाल श्री पंढरी गोबा कांबळे यांना देखील उत्कृष्ट कोतवाल म्हणून गौरविण्यात आले आहे. या आनंददायी प्रसंगाच्या निमित्ताने या दोन्ही सन्मानप्राप्त महसूल कुटुंबातील सदस्यांचा जामनेर तालुका महसूल संघटना तसेच जामनेर तालुका तलाठी संघ यांचेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच तलाठी संवर्गातील अव्वल कारकून या पदावरुन पदोन्नती घेऊन जामनेर तालुका येथे नुकतेच  नायब तहसिलदार,महसूल या पदावर रुजू झालेले श्री. सुभाष कुंभार रावसाहेब यांचा देखील सत्कार करण्यात आला. 

काही क्षणचित्रे 





REVENUE DAY